"बेटी बचाओ बेटी पटाओ" मोदी ट्विटर - लाईव्हमध्ये पीएम मोदींची जीभ घसरली
नवी दिल्ली : एका कार्यक्रमाला संबोधित करताना बेटी बचाओ, बेटी पढाओ, च्या ऐवजी बेटी बचाओ, बेटी पटाओ असे म्हणत पंतप्रधान मोदींच्या कथित वक्तव्यामुळे सोशल मीडियावर पीएम मोदींना ट्रोल केले जात आहे.
बेटी बचाओ बेटी पटाओ मोदी विडिओ
आज ब्रह्मा कुमारी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी लोकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. नागरिकांना संबोधित करताना 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' ऐवजी 'बेटी बचाओ, बेटी पटाओ' म्हणत त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्तरावर जनतेला संबोधित करताना एका घोषणेचा चुकीचा उच्चार करून चुकीचा संदेश दिल्याची टीका होत आहे.
काय आहे हे बेटी बचाओ, बेटी पटाओ?
एका कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींची जीभ घसरली. त्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी पंतप्रधान मोदींना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
पंतप्रधान मोदींचा हा कथित व्हिडिओ लवकरच सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर लोकांनी पंतप्रधान मोदींना ट्रोल करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावरील वापरकर्त्यांनी पंतप्रधानांना सल्ला दिला की एकतर टेलिप्रॉम्प्टर बदला किंवा तो चालवणाऱ्याला काढून टाका.
