महाराष्ट्रात लॉकडाऊनचे निर्बंध जाहीर - Maharashtra Lockdown News
महाराष्ट्रात लॉकडाऊनचे निर्बंध जाहीर
महाराष्ट्रात १३ एप्रिल रात्री ८ वाजेनंतर निर्बंध लावण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. निर्बंध जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय. संपूर्ण राज्यभर १५ दिवसांसाठी कडक निर्बंध करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त इतरही महत्त्वाच्या विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधला.
निर्बंध हे खालीलप्रमाणे
- संपूर्ण राज्यात १४४ कलाम लागू
- सकाळी ७ ते रात्री ८ या काळात अत्यावश्यक सेवा चालू राहणार
- वाहन सेवा हि काही कामांसाठी चालू असणार
- फक्त अति महत्वाच्या कामासाठी बाहेर जाण्यास परवानगी
राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत असल्याने संपूर्ण देशातून जास्त प्रमाणात ऑक्सिजनची मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली त्याचप्रमाणे या पुरवठ्यासाठी विविध प्रकारच्या सुविधा देखील उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज देण्यात आलेला आहे.
परीक्षा केव्हा होणार
राज्यातील महत्त्वाच्या परीक्षा म्हणजेच राज्यसेवा मुख्य परीक्षा दहावी-बारावी इत्यादी या तात्पुरते पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. आणि पुढील काळात करुणा चे संकट कमी झाल्यानंतर त्या घेण्यात येतील असे देखील आपणास समजते.
यावेळेस Corona ची लाट ही अत्यंत मोठी असून दिवसाला 50 हजार पेशंट वाढत आहेत. त्याच प्रमाणे आजचा पेशंटचा आकडा देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यामध्ये 62 हजारच्या आसपास पेशंट एकट्या आजच्या दिवसात वाढलेले आहेत. यावरून आपण सर्व ठिकाणांची Corona ची परिस्थिती समजू शकतो.
सर्वांनी स्वतःची आणि परिवाराची काळजी घेण्याबद्दल देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे स्वयंसेवी संस्थांना देखील त्यांनी आवाहन केले आहे या संकटाच्या काळात राज्याला मदतीचा हात दाखवावा.

