गुढीपाडवा का साजरा करतात - Gudi Padwa Ka Sajra Kartat in Marathi
Gudi Padwa Ka Sajra Kartat in Marathi
नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व. आजच्या लेखात आपण बघणार आहोत गुढीपाडवा हा का साजरा करण्यात येतो. किंवा गुढीपाडवा साजरा करणे मागचे नेमके कारण काय आहे. महाराष्ट्रात अती उत्साहाने साजरा करण्यात येणारा हा सण भरपूर वर्षांपासून साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे याचे वैशिष्ट्य म्हणजे मराठी वर्षाची सुरुवात म्हणून या सणाला ओळखले जाते. तर आपण संपूर्ण लेखात बघणार आहोत की गुढीपाडवा का साजरा केला जातो.
महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात हा सण साजरा करण्यात येतो आणि इतर राज्यांमध्ये या सणाचे नाव हे काही ठिकाणी वेगळे आहे जसे की उगादी. महाराष्ट्रात याला आपण सर्वजण गुढीपाडवा म्हणून ओळखतो. आता पण बघूया गुढीपाडव्याच्या इतिहास.
History of Gudi Padwa
गुढीपाडवा हा वसंत ऋतूच्या आरंभाला म्हणजेच पहिल्याच दिवसाला साजरा करण्यात येतो. कुठल्याही प्रकारचे विजयाचे प्रतिक म्हणून गुढी उभारण्याची प्रथा परंपरिक काळापासून महाराष्ट्रात किंवा भारतात आहे. राजाचा विजय त्याचप्रमाणे मोठा विजय प्राप्त झाल्यानंतर गुढीपाडवा साजरा करण्याची प्रथा पुरातन काळात होती. परंतु काही ठिकाणी या प्रथेबद्दलच्या नवीन इतिहासाबद्दल आपणास बघायला मिळते. याचा उगम मात्र फार प्रारंभाच्या काळात झालेला आहे. खाली याबाबदल संपूर्ण वाचा.
गुढीपाडव्याच्या उगमाचा संदर्भ आपणास महाभारतात बघावयास मिळतो. एका पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की उपरिचर राजाने इंद्राला आदर दाखवण्यासाठी त्याच्या हातातली कळकाची काठी ही उलटी करून जमिनीत रोवली आणि नेमका याच वेळी नवीन वर्षाचा कालावधी होता. वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्या काठीची पूजा राजाने केली. हे बघून इतर राजांनी देखील अशाच प्रकारे काठी करून तिची पूजा करण्यास सुरुवात केली. नंतरच्या काळात या काठीवर विविध प्रकारची वष्रे लावली जात असत. त्याचप्रमाणे तिला विविध प्रकारे सजवण्यात ही येत असे. नंतर पुष्प अर्पण करून त्याचप्रमाणे आंब्याची पाने लावून सजवण्यात येत असे. हा संदर्भ आपणास आदिपर्वात पण मिळतो. या प्रकारे गुढीपाडवा साजरा करण्याबद्दलचे संदर्भात आपणास दुसऱ्या पर्वात देखील मिळतात.
भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती या दिवशी केली म्हणुन देखील गुढीपाडव्याची ओळख आहे. हे झाले या सणाबद्दल चे प्राचीन काळातील संदर्भ. यांव्यतिरिक्त देखील याचे महत्त्व म्हणजे गुढी पाडव्याच्या दिवशी आपण गुढीला कडूलिंबाची पाने लावत असतो. ही पाणी आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगली असतात, यांचे नियमितपणे सेवन केल्याने शरीर स्वास्थ्य नीट राहते त्याच प्रमाणे शरीरात थंडावा देखील टिकून असतो. उन्हाळ्याच्या दिवसात साजरा करण्यात येणारा गुढीपाडवा हा सण आणि गुड्डीला लावण्यात येणारी कडुनिंबाची पाने ही आपण देखील खावीत हे यामागचे कारण होय.
Gudi Padva Information in Marathi
भारतातील हिंदू संस्कृतीच्या या सणांचे महत्त्व अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. या दिवशी कुठल्याही नवीन वस्तू किंवा संपत्ती यांची पूजा करण्यात येते त्याचप्रमाणे विविध गोष्टींची खरेदी देखील करण्यात येते. कुठल्या प्रकारचा शुभारंभ करायचा असेल तर हा एक शुभ मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करतात.
गुढी पाडवा का साजरा करतात लेख
आजच्या लेखात आपण बघितले गुढीपाडवा हा सण का साजरा करण्यात येतो. मराठी संस्कृतीत आणि इतर ठिकाणी देखील या सणाला महत्त्व आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला आमचे लेखन आवडले असेल तर आम्हाला फॉलो करा आम्ही नियमितपणे अशा प्रकारची लेख टाकत असतो.

